© : Copyright

Monday, April 5, 2010

बागायती कापसाचा उत्पादन खर्च


बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
-----------------------------------------------
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
-----------------------------------------------
अ) चालू खर्च..
शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
----------------------------------------------
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
----------------------------------------------
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
.... चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
--------------------------------------------------------------------------------
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
--------------------------------------------------------------------------------
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००
---------------------------------------------------------------------------------
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००
---------------------------------------------------------------------------------
.
.
........ वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.

2 comments:

  1. धन्यवाद विनोदकुमारजी.
    (चांगला लेख आहे. जर १० एकरावर ७०००० रुपये तोटा आहे तर मग शेती करायची तर कशी?)
    शेती करायची ती कर्जबाजारी होण्यासाठी. म्हणुन तर देशातील अख्खे शेतकरी कर्जबाजारी आहेत.)
    (एकराला ६ क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन नाही घेता येत?)
    एकरी ३० क्विंटल पर्यंत उत्पादन घेता येते. पण हे वरकड उत्पादन आपोआप येत नाही त्यासाठी उत्पादन खर्च वा्ढवावा लागतो. आणि मग जेवढे वरकड उत्पादन जास्त तेवढा उत्पादन खर्च जास्त हे समिकरण तयार होते. त्यामुळे जेवढे उत्पादन जास्त तेवढा तोटा जास्त असा विचित्र सिद्धांत तयार होतो. शिवाय उत्पादन खर्च वाढवणे आपले हाती असते पण नैसर्गिक आपत्ती, बाजारभाव यावर आपले नियंत्रण नसते. यदाकदाचित बाजारभाव कोसळलेत तर प्रचंड उत्पादन घेवूनही तोटा एवढा असतो की तो फ़ेडायला एक पिढी अपुरी पडते.

    ReplyDelete
  2. विनोदकुमारजी,
    -शेतमालाचा भाव ठरविणे शेतकर्‍यांच्या हातात नाही.
    -उपकरणे वापरली तर हातमजूरीपेक्षा जास्त खर्च येतो.
    - मुख्य व्यवसाय जर शेतीचा असेल तर शेती हाच व्यवसाय परवडायला हवा. जोडधंद्याची गरज भासूच नये.
    एक भाऊ जर शेती करीत असेल तर दुसर्‍याने दुधाचा धंदा करावा.

    ReplyDelete

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

काव्यवाचन

काव्यवाचन

My Blog Rank

मराठी ब्लॉग विश्व

रानमेवा-माझा प्रकाशित काव्यसंग्रह

आपले मत महत्वाचे आहे.

आपला अभिप्राय.

Connect With Us