शेती चर्चा - भाग १.
ईन्टरफेल | 10 May, 2010 - 09:56
कुनि निंदा कुनि वंदा शेति हाच आमचा धंदा! तुम्हांला काय वाटते ? आम्हि शेतकरि लोक वेडे आहोत का ? आहो...आमच्याकडे दोन दोन एकर शेति आसनारे मोटारसायकल घेउन फिरतात! मला चांगल आठवत..१९९५ सालि आमच्या गावात एकच ग्रामपंचायतिचा टिव्हि होता आज घडिला रोजंदारिवर काम करनार्याच्या घरि डिश आनि कलर टिव्हि आहे ब्लॅकव्हाईट टिव्हि आनि दुरदर्शनचि अॅटेना बघायला देखिल मिळ्नार नाहि ! १० लाख शेतकर्यां मागे एखाद्याने आत्महात्या केलि आसेल तर आख्खा शेतकरि वर्ग कर्जात आहे आसे म्हनायचे आहे काय ? मि स्वता: एक हाडाचा शेतकरि आहे मि माझ्या मातित सुखात आहे .आता माझि शेति सोडुन तुमच्या शहरात काम करायला आलोच तर... मि दाहावि नापास! मला कोन काम देईल ? समझा दिलहि तरि .......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व मिळेल का? आहे उत्तर कुनाकडे? त्यापेक्षा मि माझ्या शेतित गावात सुखात आहे! आनि नेटवर बसुन आपल्या सारख्या विद्वान मंडळिंच्या चर्चेत सहभागहि घेत आहे ! बाकि तुमच चालु ध्या ..दळत बसायला काय हारकत आहे?.आपल्या ईतके आंम्हि हुशार नाहि आनि आमचे ईतके वाचन हि नाहि.......कार्ट बावळटहे घ्या पदरात ...................बाकि आंम्हि हिकड खाउन पिउ,,,,,,,,न सुखि आहोत.. ;) .आंमळ काळजि नसावि........ ;) ..एक शेति ऊपयोगि माणुस न मिळाल्या मुळे शेति करित नसलेला शेतकरि............
गंगाधर मुटे | 10 May, 2010 - 22:41
१० लाख शेतकर्यां मागे एखाद्याने आत्महात्या केलि आसेल तर आख्खा शेतकरि वर्ग कर्जात आहे आसे म्हनायचे आहे काय ?
दुर्दैवाने अख्खा शेतकरी वर्ग कर्जात आहे, हे खरे आहे.
आणि महत्वाची गोष्ट अशी की आत्महत्त्या करणार्या शेतकर्यापेक्षा, आत्महत्त्या न करणार्या शेतकर्यावरील कर्जाचा आकडा मोठा आहे.
त्यापेक्षा मि माझ्या शेतित गावात सुखात आहे!
.......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व नोकरी करूनच किंवा उद्योग करूनच मिळू शकतात. शेती करून नाही हे तुम्ही एका अर्थाने मान्य करता आहात.
.......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व न मिळताच तुम्ही सुखी आहात हे तुमच्या "सुखाच्या" व्याख्येवर अवलंबून आहे.
ईन्टरफेल | 11 May, 2010 - 17:47
होय >>> आत्महत्त्या करणार्या शेतकर्यापेक्षा, आत्महत्त्या न करणार्या शेतकर्यावरील कर्जाचा आकडा मोठा आहे.तुमच म्हनन खरहि आसेल , जर आख्खा शेतकरी वर्ग कर्जाखालि आसेल,तर त्याला जे कर्जबाजारी शेतकरी आहेत तेच जबाबदार आहेत,कर्जाचा डोंगर काहि एका वर्षात होत नाहि,ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल तोहि आज २० ते २५ ह्जाराचे{हा आकडा ऊदाहरनादाखल आहे ह्या पेक्षा कितितरी पटिने जादा आसु शकतो} कर्ज कढतो मग! ते फेडायचे कसे? त्यात ह्या राजकिय पक्षांचा थयथयाट , आंम्हि विज बिल माफ करनार ,शेतिवरिल कर्ज माफ करनार, त्यामुळे हा जो कर्जाखालिल वर्ग आहे तो कर्जच भरत नाहि, त्यामुळे शेतीच्या मुळ किमती पेक्षा कर्ज जादा होते, परिनामि कर्ज वाढत जाते , मग बँकेच्या नोटिसा, कोर्टाच्या नोटिसा, त्याचे परिनाम आपल्या समोर आहेच! ...........आमच्या बाबतित बोलायच झाल्यास, आंम्हि वेळेवर कर्ज भरतो, अन..नाहि भरायला जमले तर व्याज भरुन रीनिव्ह करुन घेतो,आनि...>कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व न मिळताच तुम्ही सुखी आहात हे तुमच्या "सुखाच्या" व्याख्येवर अवलंबून आहे. >>> आहो हे सर्व आमच्याकडे आहे ! स्व:ताचे आहे, आणि हे वर लिहिलेले आहे. त्यावर बसुन तर आंम्हि नसलेल्या आकलेचे तारे तोडतोय! आनि हो आंम्हि खरोखर दहावि नापास आहोत मला दहाविला सर्व विशयात ८८ मार्क होते! आपल्या ईतके आंम्हि हुशार नाही! आनी आमचे ईतके वाचन हि नाही.....कार्ट बावळटहे घ्या पदरात ................ ;) ! ..एक शेती ऊपयोगी माणुस न मिळाल्या मुळे शेती करीत नसलेला शेतकरी............
गंगाधर मुटे | 11 May, 2010 - 18:47
ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल तोहि आज २० ते २५ ह्जाराचे{हा आकडा ऊदाहरनादाखल आहे ह्या पेक्षा कितितरी पटिने जादा आसु शकतो} कर्ज कढतो मग!
ईन्टरफेल, तुम्ही अगदी या देशातल्या थोर विचारवंतासारखेच विचार करताय. कारण तुमच्या वरील एका वाक्यातच या देशातल्या शेतीची हलाखी स्पष्ट होत असतांना तुम्ही मात्र ते मानायला तयार नाहीत.हाच गुण नेमका विचारवंतामध्ये आणि तज्ज्ञामध्ये आढळत असतो.
आता हे बघा.
१) शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल
दहा हजार वार्षिक उत्पन्न म्हणजेच एका अख्ख्या शेतकरी कुटूंबाचं उत्पन्न.
एवढ्या उत्पन्नात शेतीसाठी होणारा खर्च किती? त्याला जगायला उरतात किती? एवढ्या उत्पन्नात कसे जगावे? या विषयी जरा सविस्तर लिहाना.
२) आणि मग तो कर्ज काढून जगत असेल तर तो दोष कसा?
त्याने कंदमुळे, पालापाचोळा, दगड धोंडे खावून जगावे काय?
की त्याने आणि त्याच्या कुटूंबियाने पैसे नसेल तर कपडेही घालू नये? कपडे घातले नाही तरी चालेल पण कर्ज काढू नये, असे तुम्हाला वाटते?
३) अजिबात कपडे न घालणारेही स्वतःला सुखी समजतातच की.
४) ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल त्यालाहि २० ते २५ ह्जाराचे कर्ज मिळत असेल तर या देशातल्या बँका बेअक्कल/ अव्यावहारी आहे हे सिद्ध होते.
त्यांचा दोष शेतकर्याच्या माथ्यावर का मढता?
अनिल७६ | 12 May, 2010 - 12:31
मुटेजी , तुमचे सगळे मुद्दे नेहमी अस्सल असतात !
हे सगळं कोठुन आल ?
गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 14:32
<< मुटेजी , तुमचे सगळे मुद्दे नेहमी अस्सल असतात !
हे सगळं कोठुन आल ? >>
अनिलजी, हे सर्व आपल्या अवतीभवतीच असते.
त्यासाठी विद्द्याविभुषणांची गरजच नाही.
फक्त एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण मानवीय असावा.
अनिल७६ | 12 May, 2010 - 15:48
मुटेजी, ....(तोच प्रतिसाद (बदलुन) पण योग्य जागी टाकतोय ...)
या कृषीप्रधान देशात एखाद्या शेतकर्यांसाठी लढणारयां नेत्यांच्या सभेची,संघर्षाची,आंदोलनाची,उपोषणाची बातमी,त्यात पोटतिडकीने मांडलेले अनेक ज्वलंत आणि त्याच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले मुद्दे,झालेली चर्चा यांना आपल्या देशात वर्तमानपत्रात खरच किती आणि कुठे जागा असते ? त्यापेक्षा एखाद्या शेतीवर उभ्या आयूष्यात चकार शब्द न काढलेल्या पुढारयाच्या "वाढदिवसाची " सचित्र बातमी पहिल्या पानावर झळकते...
गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 16:34
अनिलजी,
शेतकरी काय किंवा शेतकरी नेता काय.... यांची दखल घ्यावी असे यांच्याकडे काय आहे?
हे सगळे फुकट वर्तमानपत्र वाचतात, विकत घेवून वाचत नाही असे त्यांना वाटते.
वर्तमानपत्र विकत घेवून वाचणारे आणि जाहीरात देणारे त्यांच्यासाठी महत्वाचे.
आणि तरीही हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ बरका....!!
गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 16:44
<< माझ्या मते, उगाच सरकार किंवा शेतकरी यांना दोष देण्या पेक्षा, भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यावर चर्चा झाली तर ते उत्तम राहील....>>
गणेशजी,
चर्चा कोणी करायची? तुम्ही आणी मी.
कशासाठी? तर भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यासाठी.
तुम्ही आणि मी चर्चा केल्याने भारत कृषीप्रधान देश बनेल?
भारताला कृषीप्रधान देश बनविण्याची ताकद आणि 'अधिकार' माझ्याकडे नाहीत.
तुमच्याकडे आहेत? जर नसेल तर... चर्चेचा उपयोग?
ज्याच्याकडे ताकद आणि 'अधिकार' आहे त्या सरकारला सोडून देवून ...
निव्वळ वांझोटी चर्चा करण्याचे प्रयोजनच काय?
अनिल७६ | 12 May, 2010 - 16:59
मुटे जी, खरं आहे !
वर्तमानपत्र विकत घेवून वाचणारे आणि जाहीरात देणारे त्यांच्यासाठी महत्वाचे.
आणि तरीही हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ बरका....!!
आजकाल तर या "स्तंभाला" पेड न्युज चा "आधार" ज्यास्त मिळु लागलाय ....!
अनिल७६ | 12 May, 2010 - 17:13
मुटेजी, तुमच्या मते ..
भारत खरंच कृषीप्रधान होण्यासाठी ,शेतीला दिवस चांगले येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील ?
ज्याच्याकडे ताकद आणि 'अधिकार' आहे त्या सरकारला
मला तर वाटतं यासाठी शेतकरयांची स्वतंत्र "वोट बैंक" निर्माण झाली पाहिजे,अधिकाधिक लोक त्यातुन निवडुन गेले पाहिजेत ...
गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 17:14
<< भारत खरंच कृषीप्रधान होण्यासाठी ,शेतीला दिवस चांगले येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील ?>>
सर्वप्रथम " शेती फायद्याची होईल अशी व्यवस्था व्हायला पाहीजे"
त्यानंतर बाकी सर्व.
(मायबोलीवरून साभार) (क्रमश:)
...................................................................................
No comments:
Post a Comment